पनवेल : रायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 19) झाली असून, 422 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 416 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये अलिबाग तीन, पनवेल दोन, उरण, खालापूर, कर्जत, मुरूड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल 238, अलिबाग 35, माणगाव 30, खालापूर 23, महाड 22, पेण 21, उरण 15, रोहा 11, कर्जत 10, सुधागड आठ, पोलादपूर सात व श्रीवर्धन दोन असे आहेत. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 22,352 व मृतांची संख्या 671 झाली आहे. 18,333 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3348 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper