Breaking News

डायबिटीज जनजागृती मॅरेथॉनला पनवेलमध्ये प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर

समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॅरेथॉन रविवारी (दि. 13) नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मधुमेह आणि त्याच्या संभाव्य गुंतागुंतीमुळे कुटुंब आणि समाजावर आरोग्यसेवेचा भार पडतो. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मधुमेहाने त्रस्त व उपचार घेऊ शकत नसलेल्या गरजू, गरीब लोकांसाठी इन्सुलिन बँक संकल्पना आखण्यात आली आहे. या इन्सुलिन बँकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रेशनिंगच्या स्वरूपात इन्सुलिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमधून येणार्‍या डोनेशन रकमेचा उपयोग डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून इन्सुलिन बँक उभारणीसाठी केला जाणार आहे. दोन गटांत झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे 500हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. या उपक्रमाला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व अन्य सेवाभावी संस्थांनी हातभार लावला. विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझनचे अध्यक्ष स्वप्नील गांधी, सेक्रेटरी विनीत परमार, खजिनदार अंकित शहा, डायबेटिस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गणेश हांडे, खजिनदार स्वाती हांडे, सेक्रेटरी कविता बोराडे, ट्रस्टी अमित धवडे, रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझनच्या अध्यक्ष इशा शिंदे, रोटरी सदस्य अभिजीत सावळेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply