पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एका दिवसातील सर्वाधिक 524 रुग्णांची रविवारी (दि. 19) नोंद झाली असून, 17 जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 181 (महापालिका 139 व ग्रामीण 42), पेण 92, खालापूर 82, अलिबाग 71, रोहा 27, उरण 18, कर्जत 16, माणगाव व महाड प्रत्येकी 11, म्हसळा 10, श्रीवर्धन चार आणि पोलादपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. मृत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच (मनपा चार व ग्रामीण एक), पेण चार, अलिबाग व रोहा प्रत्येकी तीन आणि खालापूर व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 252 रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 हजारांच्या वर जाऊन 10,438 इतका, तर मृतांची संख्या 277 झाली आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …