मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे. बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामात सहभाग घेतला असून त्यांनी रविवारी (दि. 23) बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाइन संवाद साधला. बिहारची निवडणूक देशातील पहिली डिजिटल निवडणूक ठरणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ऑनलाइन नामांकन दाखल केले जाणार आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …