पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जात आहे. या अंतर्गत पनवेल शहरातील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्यापासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजच्या वतीने नागरिकांची विविध प्रकारे सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू झाली. मदतीचा हा ओघ आजतागायत चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील 60 हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचे एकत्रित पॅकेट देऊन गणेशोत्सव गोड केला जात आहे. त्यानुसार पनवेलच्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वाटपावेळी नगरसेविका रूचिता लोंढे, चंद्रकांत मंजुळे, राजेंद्र कोळी, लखन जाधव, संतोष ढगे, प्रदीप रणदिवे, रोशन जाधव, दीपक चखलिया आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper