पनवेल बातमीदार : लोकसभा निवडणुकीदरम्यान, नागरिकांना आचारसंहिता उल्लंघनाबाबत तक्रार करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी खास 93724 19799 हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व अन्य प्रसारमध्यमांद्वारे झालेल्या आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येणार आहे. या तक्रारीवरून पोलिसांकडून जी कारवाई करण्यात येईल, त्याची माहितीसुद्धा संबंधितांना देण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्यानंतर 10 मार्चपासून संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण देशामध्ये चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील ठाणे आणि मावळ या दोन मतदारसंघांत 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून निवडणूक काळात कुठल्याही प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी खास मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया (एसएमएस) व अन्य प्रसारमाध्यमांद्वारे त्याचप्रमाणे अन्य कुठल्याही प्रकारे आदर्श आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्यांनी नवी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षातील 93724 19799 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …