
पनवेल : बातमीदार
नागरिकांच्या मोबाइल नंबर तसेच इंटरनेटवरून चोरी केलेल्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती वापरून वेबसाइटवरून ऑनलाइन शॉपिंग करून फसवणूक करणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ऑनलाइन शॉपिंग करून त्या वस्तूंची विक्री करून अंदाजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शहर पोलिसांनी मुदस्सीर अकलख शेख (वय 38, कुर्ला), मोहम्मद रफीक अब्दुल रहमान पंसारी (वय कुर्ला), सलमान अब्दुल्ला अन्सारी (वय 27 कुर्ला) यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी मागील दोन वर्षांपासून अशाच प्रकारे भारताबाहेरील लोकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माहितीची चोरी करून त्याद्वारे ऑनलाइन शॉपिंग केली असल्याचे कबूल केले आहे. यातील मुद्दस्सीर शेख यांने त्याच्यासोबत आणखी काही आरोपी काम करत असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून त्याद्वारे ऑनलाइन शॉपिंग केली जात असे. आणि त्या वस्तूंची विक्री करून आरोपींनी जवळपास अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 65 (क) 75 अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.