Breaking News

खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला

पनवेल : वार्ताहर

खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या पुलावरुन नेहमी ये-जा करणारे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

खारघर आणि कोपरा वसाहतीच्या सीमारेषेवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने सिडकोने दोन वर्षांपूर्वी या पुलावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे शेजारी असलेल्या एकेरी पुलावर वाहतूक कोंडी होत होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 25 लाख रुपये खर्च करुन सिडकोने खारघर-कोपरा पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. तीन महिन्यांत खारघर-कोपरा पूल दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराकडून खारघर-कोपरा पूल दुरुस्तीचे काम धीम्या गतीने सुरु राहिल्याने खारघर शहर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील तसेच मनेश पाटील आदींनी सिडको अधिकार्‍यांना भेटून खारघर- कोपरा एकेरी पुलावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी केली होती. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू केल्याने खारघर-कोपरा पूल दुरुस्तीचे काम थांबविण्यात आले होते. अखेर खारघर-कोपरा पूल दुरुस्तीचे काम पूर्ण करुन ऐन गणेशोत्सवात खारघर-कोपरा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने या पुलावरुन ये-जा करणार्या नागरिक आणि वाहन चालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply