Breaking News

विवाहितेचा विनयभंग करणारा अटकेत

पनवेल : बातमीदार

पेण तालुक्यातील एका विवाहितेला रस्त्यात अडवून तिला दमदाटी करीत, तसेच तिचा हात पकडून विनयभंग करणार्‍याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पेण तालुक्यातील एक महिला दररोज पनवेल ते पेण असे ये-जा करीत असते. तिचा उलवे येथील बामणडोंगरी येथे राहाणारा गौतम कृष्णा कदम (38) हा पाठलाग करीत असे. 5 मार्च रोजी ही महिला नेहमीप्रमाणे पनवेल रेल्वेस्थानकाकडे जात असताना स्थानकाबाहेरील चौकात गौतम कदम याने तिचा रस्ता अडवून तिचा हात पकडत नवर्‍याला सोड मी तुला सुखात ठेवेन असे म्हणत तिच्याशी दमदाटी केली, तसेच आपले प्रेम असल्याचेही त्याने तिला सांगितले. या वेळी त्या महिलेला मनात लज्जा उत्पन्न होईल असेही तो वागला. त्यामुळे पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मात्र पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. तब्बल पाच दिवसानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विश्वासराव बाबर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply