Breaking News

कोपर येथे कोविड लसीकरण शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने कोपर ग्रामस्थांसाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये दोन दिवसीय मोफत कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमास कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, सरपंच माई भोईर, उपसरपंच अरुण कोळी, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य व भाजप उलवे नोड-2चे अध्यक्ष विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, कामिनी कोळी, योगिता भगत, सुमन घरत यांच्यासह बी. टी. कांबळे, काशिनाथ पाटील, कमलाकर घरत, सी. एच. घरत, किशोर पाटील, सुहास देशमुख, व्ही. के. ठाकूर, रघुनाथ देशमुख, संदीप म्हात्रे, शिवाजी देशमुख, रामदास घरत, दामोदर भोईर, भाऊ भोईर, विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, उपप्राचार्य जगन्नाथराव जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाइफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात अरुणशेठ भगत यांनी सर्व नागरिकांनी लसीकरण झाल्यानंतरसुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन केले, तर महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाण ग्रामपंचायतीच्या गाव तेथे लसीकरण शिबिर उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य विजय घरत यांनी मानले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply