Breaking News

भाजप कामगार आघाडीच्या कोकण प्रभारीपदी विनोद शहा

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी प्रदेश संयोजक गणेश ताठे व प्रभारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच कामगार आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली असून यामध्ये कोकण प्रभारी व महाराष्ट्र कामगार आघाडी कार्यकारिणी सदस्यपदी रायगडमधून विनोद शांतीलाल शहा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे.

मागील तीनवर्षांपासून रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगार आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्त्याचे, कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम विनोद शहा करीत असुन कोकणात चांगले योगदान दिल्यामुळे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपाचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, कामगार यांच्या सहकार्याने कामगार क्षेत्रात चांगले योगदान दिल्याबद्दल भाजपच्या कोकण विभाग कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत संघटनात्मक काम चांगल्या प्रकारे केल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहचून कामगारांचे प्रश्न सोडविणे, पक्षाचा प्रचार-प्रसार करणे यामुळे विनोद शहा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे.  त्यांच्या निवडीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, भाजप शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी यांनी त्याचे अभिनंदन केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply