Wednesday , June 7 2023
Breaking News

शिव-समर्थ स्मारक लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीटीच्या वतीने साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी या तयारीची शुक्रवारी (दि. 16) पाहणी केली. पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत होते.

जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तान फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित शिव-समर्थ स्मारक उभारण्याचे काम मागील वर्षापासून सुरू केले आहे. सुमारे 30 कोटी खर्चून 22 मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या पावणेदोन एकर जागेत उभारण्यात येत आहे.

या शिव-समर्थ स्मारकाचे लोकार्पण येत्या रविवारी (दि. 17) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, संभाजीराजे भोसले, दुर्ग समितीचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या वेळी सुमारे सात लाख शिवप्रेमी, श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याने त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply