खारघर : प्रतिनिधी
राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे जयंतीदिनी जलभुषण पुरस्कार प्रदान करण्या संदर्भात जून महिन्यात घेतलेला शासन निर्णय रद्द करून राज्यात जलसंधारण खाते सुरु करून पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाणलोट विकास क्षेत्रात भरीव काम करणार्या माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंत दिनी पुरस्कार देण्याचे परिपत्रक काढण्यात देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जय सेवा वसंत बंजारा सामाजिक संस्था आणि संत श्री सेवादास बहुद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळाने गुरुवारी (दि. 3) पनवेल तहसीलदारांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाने 12 जुन 2020च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांचे जयंतीदिनी जलभुषण पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शंकररावज चव्हाण साहेब यांचे फार मोठे योगदान आहे. परंतु राज्यात जलक्रांतीची सुरूवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवाहा मुलमंत्र देवून जलसंधारण खाते सुरू केले त्यामुळे पाणलोट विकास क्षेत्राचे जनकया नावांनी नाईक ओळखले जाते. राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे जयंतीदिनी जलभुषण पुरस्कार प्रदान करण्या संदर्भात काढलेला परिपत्रक रद्द करून माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंत दिनी पुरस्कार देण्याचे परिपत्रक काढण्यात देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन पनवेल तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या वेळी मंडळाचे पदाधिकारी सतिश राठोड सुनील आडे, रमेश पवार, छगन राठोड, अनिल जाधव, अविराज पवार, संजय पवार, रोहिदास राठोड, संजय राठोड, गजानन पवार, दिनकर राठोड, खुशाल राठोड, गोकुळ राठोड, भीम चव्हाण यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.