Breaking News

‘डब्ल्यूएचओ’ने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

लस समानतेला दिलेल्या समर्थनाचे कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताने लस वितरण मोहिमेंतर्गत 60पेक्षा अधिक देशांत लस पोहचवण्याचे निश्चित केले आहे. नेपाळ, बांगलादेश, भूतान व इतर शेजारी देशच नाही, तर भारत सरकारने पश्चिम आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनाही लस पाठविली. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी (दि. 25) भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले.
त्यांनी आशा व्यक्त केली की इतर देशांनीही भारताचे अनुकरण केले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडच्या महामारीवर मात करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या अंतर्गत छोट्या देशांना मदत करण्याच्या प्रतिज्ञेचा एक भाग म्हणून ‘लस मैत्री’ उपक्रमांतर्गत इतर देशांना विनाशुल्क लस पुरवण्यास सुरुवात केली आहे.
आपल्याा ट्विटर संदेशात ते म्हणाले की, लस समानतेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तुमची कोवॅक्स आणि कोविडवरील लस लोकांपर्यंत पोहचवण्याच्या वचनबद्धतेमुळे 60पेक्षा अधिक देशांना त्यांचे आरोग्य कर्मचारी आणि इतर प्राधान्य गटांना लशी देण्यास मदत होत आहे. मला आशा आहे की इतर देश आपल्या उदाहरणाचे अनुकरण करतील.
भारताने विविध देशांना आतापर्यंत लशीचे 361 लाखांहून अधिक डोस पाठविल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. त्यापैकी 67.5 लाख डोस अनुदान सहाय्य म्हणून, तर 294.44 लाख डोस व्यावसायिक तत्त्वावर ग्राहकांना देण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply