Breaking News

वाहतूक सुसूत्रता, महिला सुरक्षेला प्राधान्य देणार -बिपीन कुमार

पनवेल : बातमीदार

लाच लुचपत विभागात अप्पर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असणारे बिपीन कुमार यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर सायबर गुन्हेगारी राखण्याबरोबर वाहतूक कोंडी, महिला सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.बिपीन कुमार यांनी गुरुवारी दुपारी संजय कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली असून तत्कालीन आयुक्त संजय कुमार यांच्यासमवेत बैठक घेत शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि करोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर अन्य विभागांच्या पोलीस उपायुक्तांची बैठक घेत प्रत्येक विभागाची सविस्तर माहिती घेतली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, कोरोनाकाळातही मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. पोलिसांचे आरोग्यही उत्तम राहील याकडे लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय आर्थिक फसवणूक व सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान आहे. साखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरीचे प्रमाणही अधिक असून त्याला आळा घालण्यास प्राधान्य देण्यात येईल.

जय जाधव सहआयुक्तपदी

आयुक्तांच्या बदलीबरोबरच सह आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. मात्र अद्याप नवीन सहआयुक्त जय जाधव रुजू झालेले नाहीत. जय जाधव हे या पूर्वी सुरक्षा मंडळावर सहसंचालक म्हणून काम करीत होते. विद्यमान सहआयुक्त राजकुमार वटकर यांची बदली मुंबईत सहआयुक्त प्रशासन विभागात झालेली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply