Breaking News

टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकर्‍यांनी टोमॅटो पीक घेतले, मात्र आता राज्यात सर्वच बाजारपेठांत आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, सातारा, सोलापूर, बारामती, सांगली या जिल्ह्यांतून टोमॅटोची आवक होत आहे. बाजारात 40 गाडी टोमॅटो दाखल होत आहेत. यातून शुक्रवारी बाजारात 2484 क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे आधी प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांनी विकले जाणारे टोमॅटोचे दर 5 ते 6 रुपयांवर आले आहेत.

मागील वर्षी महिन्यात टोमॅटो प्रतिकिलो 20 रुपयांवर होते. म्हणून राज्यात लागवड जास्त झाली असून तो शेतमाल आता बाजारात दाखल होत असल्याने आवक वाढली आहे, अशी माहिती व्यापारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.

आवक वाढली आहे मात्र नेहमीपेक्षा टोमॅटोला मागणी कमी आहे. हॉटेल सुरू आहेत, मात्र ग्राहक नाहीत. लग्न, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आहे, त्यामुळे कॅटर्सकडून मागणी नाही. फेरीवाले यांच्याकडूनही कमी मागणी आहे. त्यामुळे दर उतरले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply