दोघांचा मृत्यू; 137 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 7) कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 199 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 107 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 80 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 6 सनशाईन सोसायटी व कामोठे सेक्टर 17 शिव कल्पतरु सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 38, कामोठेमध्ये 32, खारघरमध्ये 32, नवीन पनवेलमध्ये 38, पनवेलमध्ये 53, तळोजामध्ये सहा नवीन रुग्ण आढळले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 13419 रुग्ण झाले असून 11351 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.59 टक्के आहे. 1752 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 316 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सुकापूर 18, उलवे 17, करंजाडे 15, विचुंबे सहा, नेरे चार, कोळखे, देवद, पळस्पे, सांगडे, उसर्ली येथे प्रत्येकी दोन, शिरढोण, चिंध्रण, चिपळे, जावळे-वहाळ, कराडे खुर्द, कोन, पालेबुद्रुक, पोयंजे, वाकडी, वावंजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये एकूण रुग्ण संख्या 4073 झाली असून पूर्ण बरे झालेले 3359 रुग्ण आहेत. 638 रुग्णांवर उपचार सुरू आहे तर 76 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 11 रुग्णांची नोंद
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 11 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 26 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये वशेणी, आनंदनगर, छत्रपती शिवाजी शाळा जासई येथे प्रत्येकी दोन, द्रोणागिरी नोड, फुंडे, मोठी जुई, वेश्वी, पागोटे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये करंजा तीन, जेएनपीटी दोन, कुसुम भाजी लक्ष्मी आली, पागोटे, डोंगरी, उरण, नागाव, द्रोणागिरी, सुरुंगपाडा जासई, करंजा नवापाडा, बोकडवीरा, कृष्णाईनगर चाणजे, डोंगरी, दत्त मंदिर जवळ चिरनेर, ओएनजीसी कॉलनी, मोरा पोलीस स्टेशन मागे, धुतुम, करंजा द्रोणागिरी मंदिरजवळ, गणपती मंदिर आवरे, सृष्टी कॉम्प्लेक्स केगाव, माणकेश्वर कॉलनी केगाव ग्रामपंचायत मागे, भानुशालीवाडी करंजा येथे प्रत्येकी एकाचा
समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1497 झाली आहे. त्यातील 1221 बरे झाले आहे. 206 रुग्ण उपचार घेत आहेत व 70 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण
अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सोमवारी (दि. 7) निष्पन्न झाले. त्यांचे घरीच अलगीकरणात आले आहे. दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सतर्क राहून लक्षणे दिसल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार दळवी यांनी केले आहे.
आमदार महेंद्र दळवी हे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला निघाले होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र यात त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती त्यांना तातडीने देण्यात आली. त्यामुळे अधिवेशनाला न जाता घरी परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची प्रकृती ठीक असून, त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून पुढील 10 दिवस घरातच अलगीकरणात राहणार असल्याचे आमदार दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईत 416 जण कोरोनामुक्त
नवी मुंबई : नवी मुंबईत सोमवारी 416 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 24 हजार 354 झाली आहे. तर 331 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 28 हजार 545 झाली आहे. दिवसभरात तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 633 झाली आहे.