Breaking News

जेएनपीटीची स्मार्ट टेक्नॉलॉजी

नवीन तंत्रज्ञान निवडीच्या कार्यशाळेस प्रतिसाद

नवी मुंबई ः प्रतिनिधी

मेरीटाइम क्षेत्रातील आणि इतर पोर्ट्समध्ये जागतिक पातळीवर लागू असलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाच्या ट्रेंडसंदर्भात प्रतिनिधींना माहिती मिळावी यासाठी जेएनपीटी-एंटवर्प पोर्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी फाऊंडेशनने पोर्ट्ससाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी या विषयावर आठवडाभराची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या अभ्यासक्रमात  प्रतिनिधींनी त्यांची धोरणे आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपलब्ध तंत्रज्ञान कसे निवडायचे आणि अंमलबजावणी कशी करावी यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. कार्यशाळेत जागतिक बंदराच्या उदाहरणांद्वारे तंत्रज्ञानाच्या संभाव्य ट्रेंडला समजून घेण्यासाठी प्रॅक्टिकल सत्र व क्लासरूम सत्राद्वारे एकत्रितरित्या सखोल ज्ञानाचा अभ्यास करण्यात आला, तसेच कार्यशाळेदरम्यान प्रतिनिधींनी पोर्ट कम्युनिटी सिस्टीम्स, मेरीटाइम लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म आणि ई-कस्टम्ससारखे तंत्रज्ञान अवगत केले. त्याचबरोबर सस्टेनेबल सोल्यूशन जसे डिजिटल इकोसिस्टम्स, ग्रीन एनर्जी, ई-वेस्ट, डिजिटल इनोव्हेशन, ब्लॉकचैन, जियो-फेंसिंग, बिग डेटा आणि टर्मिनल ऑपरेटिंग सिस्टममध्ये नियोजन साधने (वाय व्ही), गेट ऑपरेशन्स, उपकरण नियंत्रण, कम्युनिकेशन  साधने, बौद्धिक मालमत्ता संरक्षित करणे आदी विषयांचा अभ्यास करण्यात आला. भारतातील प्रमुख बंदरांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या सेमिनारमध्ये सहभाग नोंदविला.त्यांच्यासाठी हा उपयुक्तपूर्ण अनुभव होता. कारण त्यांना आता उपलब्ध तंत्रज्ञानाच्या संपूर्ण स्पेक्ट्रमबद्दल माहिती अवगत झाली असून ज्यामुळे पोर्टसाठी योग्य तंत्रज्ञानाची शिफारस करून योग्य व्यवस्थापनाद्वारे ग्राहक सेवा आणि नफा वाढविण्याची प्रक्रिया कौशल्याने हाताळता येईल. जेएनपीटी-एपेक केंद्रातील सर्व अभ्यासक्रम विकसित होत असलेल्या जागतिक बाजारपेठेसंदर्भात आशियातील भारतीय व इतर बंदराच्या प्रशिक्षण गरजा लक्षात घेऊन तयार केले आहेत. देशातील प्रमुख पोर्ट म्हणून जेएनपीटीही कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करते, ज्यासाठी जेएनपीटी-एंटवर्प पोर्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी फाऊंडेशनची स्थापना झाली.हे प्रशिक्षण केंद्र जेएनपीटी, एपेक एंटवर्प/फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर व पोर्ट ऑफ एंटवर्प संयुक्तरित्या चालवत असून भारतातील मेजर पोर्ट ट्रस्ट, खासगी बंदर आणि टर्मिनल्स तसेच परदेशातील बंदर/टर्मिनलमधील सर्वांसाठी खुले आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना एकमेकांशी संवाद साधता यावा, तसेच ज्ञान, कौशल्य व सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच उपलब्ध व्हावा यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply