Breaking News

पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा

मुख्यमंत्र्यांना पाठविणार सुमारे पाच हजार राख्या

पनवेल : रामप्रहर वृत्त

रक्षाबंधन पर्व अभियान अंतर्गत पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजारहून अधिक राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. या वेळी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध लोकोपयोगी योजनांद्वारे जनतेचे जीवन सुकर करण्याचा प्रयत्न पाच वर्षांत केला आहे. यामध्ये महिलांसाठी उज्ज्वला, आरोग्य यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन सणानिमित्त राख्या पाठविण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाची बैठक मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीस भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष मुग्धा लोंढे, भाजप तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, जि. प. सदस्य रेश्मा शेळके, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, तालुका सरचिटणीस लीना पाटील, प्रतिभा भोईर, कुंदा मेंगडे, समिना साठी, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, सिद्धिका पुंजानी, जैनब शेख, कल्पना ठाकूर, स्नेहलता ठाकूर, जयश्री कोळी, इंदुमती पाटील, सरपंच हेमलता भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी यांच्यासह पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

रक्षाबंधन पर्वानिमित्त 16 ऑगस्ट रोजी मुंबईत महिला मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी ते निवडक महिलांच्या राख्या प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारणार आहेत. आज विविध क्षेत्रांतील महिलांना राज्य सरकारने राबविलेल्या योजनांचा लाभ मिळत असून, त्याद्वारे त्या उत्तुंग अशी प्रगती करीत आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांचे राखी बांधून आभार मानण्यात येणार आहेत. या अनुषंगाने पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा कमिटी ही बुथ, शक्तिकेंद्र यांच्या माध्यमातून सुमारे 20 हजार राख्या पाठवून मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.

भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. यात पनवेलमधील महिलांच्या सहभागाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply