Breaking News

पनवेल तालुक्यात आढळले तब्बल 372 नवे रुग्ण

एकाचा मृत्यू; 214 जणांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 9) कोरोनाचे 372 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 254 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर 175 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये 118 नवे रुग्ण आढळले तर 39 जण बरे झाले आहेत.

महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर 4 वंदन सोसायटी येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2346 झाली आहे. कामोठेमध्ये 58 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3011 झाली आहे. खारघरमध्ये 48 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2788 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 51 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2592 झाली आहे. पनवेलमध्ये 58 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2472 झाली आहे. तळोजामध्ये 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 658 झाली आहे. एकूण 13867 रुग्ण झाले असून 11717 रुग्ण बरे झाले आहेत. 1829 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 321 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 45, करंजाडे 12, नेरे सात, वलप सहा, आकुर्ली व सुकापूर प्रत्येकी पाच, पोयंजे चार, आदई, विचुंबे व उसर्ली प्रत्येकी तीन, देवद, शिरढोण, बेलवली व कोप्रोली प्रत्येकी दोन, खानावळे, पळस्पे, भिंगारवाडी, भोकरपाडा, डेरवली, घोसाळवाडी-पोयंजे, गुळसुंदे, कासारभाट, कोपर-गव्हाण, मोसारे, नांदगाव, पालेबुद्रुक, रिटघर, सावळे, शेलघर, शिवकर, उमरोली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरण तालुक्यात 27 जणांना लागण

उरण : उरण तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळले असून 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1559 झाली आहे. त्यातील 1246 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 241 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

श्रीवर्धन तालुक्यात 15 कोरोनाबाधित

श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात बुधवारी 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये आदगाव पाच, श्रीवर्धन शहर, भट्टीचा माळ, वाकलघर, ग्रामीण भाग येथे प्रत्येकी दोन व बापवन येथे एकाचा समावेश आहे.

कर्जत तालुक्यात 49 नवे पॉझिटिव्ह

कर्जत : कर्जत तालुक्यात बुधवारी एका माजी नगरसेवक आणि एका महिला पोलिसासह 49 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तालुक्यात 1117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 829 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत.

अलिबाग तालुक्यात 206 नवे बाधित

अलिबाग : अलिबाग तालुक्यात बुधवारी 206 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 42 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या दोन हजार 55 इतकी झाली आहे. तर आजवर 69 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या 901 रूग्ण उपचार घेत आहेत.

नवी मुंबईत 355 जणांना संसर्ग; 299 रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी 355 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 165 झाली आहे. तर 299 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 25 हजार 055 झाली आहे. दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 640 झाली आहे.

 दिवसभरात नवी मुंबईच्या आठही विभागांत मिळून एक हजार 789 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. आढळलेल्या रुग्णांची नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 82, नेरुळ 42, वाशी 59, तुर्भे 49, कोपरखैरणे 44, घणसोली 40, ऐरोली 34, दिघा पाच, अशी आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply