खालापूर : प्रतिनिधी – गुरव समाजाबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणार्या इसमावर कारवाई करण्याची मागणी गुरव समाजाने खालापूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात गुरव समाज अनेक पिढ्या वास्तव्यास आहे. हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गुरव समाजाला मानाचे पान देऊन बहुमान केला होता. या समाजावर देव-देवळांची जबाबदारी टाकण्यात आली होती. अद्यापपर्यंत गुरव समाज देवळातील धार्मिक कार्ये करीत आहे. याच गुरव
समाजाबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याने तसेच घाणेरड्या शब्दांत तुलना केल्याने खालापुरातील गुरव समाज संतप्त झाला आहे. त्यांनी गुरव समाजाची अश्लील शब्दांत अवहेलना करणार्या इसमाचा निषेध करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना लेखी निवेदन दिले.
गुरव समाजाचे अध्यक्ष राहुल गुरव, योगेश गुरव, मेघा अमोल गुरव, योगिता गुरव, सपना गुरव, सुनंदा गुरव, राकेश भाऊ दळवी यांच्यासह 40 समाज बांधवांच्या या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.