पेण : प्रतिनिधी – डॉ. बाळासाहेब सावत कोकण कृषि विद्यापीठ दापोली सलग्न कृषि महाविद्यालय आचळोली महाड यांच्या वतीने पेण तालुक्यातील मळेघर येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2020- 21 चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थिनी जयश्री संजय गुठळे हिने शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
या ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमात मळेघर गावातील प्रगतशील शेतकरी विनायक हरिभाऊ पाटील यांची निवड करून त्यांना प्रात्यक्षिकाद्वारे आधुनिक लागवड पद्धती, बियाणे उगवण क्षमता चाचणी, बियाणे रासायनिक व जैविक प्रक्रिया, प्रक्रियायुक्त पदार्थांना असलेली मागणी आणि ते बनवण्याची पद्धत, किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी, पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन, चार्यावरील युरिया प्रक्रिया याची माहिती दिली या कार्यक्रमास शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रम पार पाडण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल मुराई सर कार्यक्रम समन्वयक डॉ. नेहा काळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. वैभव गिम्हावणेकर आणि सर्व विषय तज्ञ यांनी मार्गदर्शन केले.