Breaking News

मास्क न घालणार्यांवर उरण नगरपरिषदेची कारवाई

उरण : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव उरण ग्रामीण भागासहित शहरात वाढलेला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये त्या करिता उरण नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात जंतुनाशक फवारणी धुरांडी, सर्वत्र साफ-सफाई, नाले सफाई, जंतुनाशक पावडर गटारांवर मारणे आदी कामे केली आहेत. शुक्रवार (दि. 11) पासून उरण शहरात मास्क न घालणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सुमारे 52 नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली. 26 हजार रुपये दंड वसूली करण्यात आली. ही कारवाई उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, आरोग्य सभापती रजनी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत मुख्यधिकारी संतोष माळी, उद्यान निरीक्षक महेश लवटे, त्याच प्रमाणे कर्मचारी पथक प्रमुख प्रमोद मटकर, रमेश सरोदे, संजय परदेशी, राकेश कामेटकर, माधव सिद्धेश्वरे, विजय पवार, जितेंद्र जाधव, आकाश कवडे, चेतनगिरी, सचिन नांदगावकर, पोलीस नाईक, रितेश धारकर, पोलीस नाईक डी. जी. नागे आदींनी सहकार्य केले.

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो कमी झालेला नाही  नागरिकांनी सुज्ञ व्हावे, मास्कचा वापर करावा, स्वच्छता पाळावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. तसेच आज ज्याप्रकारे कारवाई झाली तशीच नियमांचे उल्लंघन केल्यास पुढेही चालु राहील.

-संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply