
मुंबई : प्रतिनिधी
ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑटोटेक, केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणार्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ऑटोटेक अॅप लॉन्च करत आहे. या पमध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. या अॅपमुळे ऑटोटेकच्या 5000 केंद्रासहित देशभरातील सर्व ऑटो गॅरेज जोडले जाणार आहेत.तसेच या अॅपच्या माध्यमाने कोणीही व्यक्ती आपल्या जवळील गॅरेजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर प्राप्त करू शकते, अशी माहिती ऑटोटेकचे चेअरमन के. डी. राठोड यांनी दिली.
यासंदर्भात पुढे सविस्तर बोलताना राठोड म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्राला डिजिटिलाईज केले जात आहे आणि हीच काळाची गरज आहे त्याचे महत्त्व लक्षात घेत संपूर्ण देशातील गॅरेजना एकाच अॅपद्वारे जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या अॅपमुळे करोडो वाहन मालकांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास ही राठोड यांनी व्यक्त केला.
ऑटोमोबाईल मधील अग्रगण्य कंपनी ऑटोटेक देशभरातील 5000 पेक्षा अधिक सर्विस सेंटरची एक चैन तयार करणार असून हे सर्व सर्विस सेंटर या एकाच अॅपमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे हे सर्विस सेंटर नावाजलेल्या कंपन्यांचे अधिकृत डीलर देखील असतील. याशिवाय खाजगी सर्विस सेंटरना देखील या अॅपच्या माध्यमातून जोडले जाणार असून त्यांना पच्या नियमावलीचे पालन करावे लागेल. ऑटोमोबाइल क्षेत्रातील हे सर्विस सेंटर्स वेगवेगळया पद्धतीने पसरलेले असल्याने असंघटित स्वरूपात आहेत. म्हणूनच डिजिटलायझेशनमुळे या अॅपच्या माध्यमाने या क्षेत्राला योग्य पद्धतीने जोडले जाईल व त्याचा फायदा अनेक सर्विस सेंटर, चालकांसह, वाहनधारकांना देखील मिळेल असेही सांगण्यात आले.