Breaking News

पनवेल पालिका हद्दीतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल पालिका क्षेत्रातील  पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना टेस्ट शनिवारी (दि.12) पनवेल पालिका मुख्यालयात करण्यात आली. तरी सर्व पत्रकार बंधु आणि भगिनींनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले होते. या आव्हानाला पालिका क्षेत्रातील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद देत 27 पत्रकारांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करून घेतली. या मधील सर्व पत्रकारांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पालिका प्रशासनाने आनंद व्यक्त केला.

कोरोनाच्या संकटकाळात थेट मैदानात उतरुन नागरिकांपर्यंत बातम्या पोहचवणार्‍या पत्रकारांपैकी राज्यातील अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. वर्तमानपत्रांच्या  पत्रकारांनबरोबरच यापैकी बहुतांश पत्रकार हे टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारे आहेत. तर यामध्ये काही कॅमेरामन आणि त्यांच्या गाड्यांच्या ड्रायव्हर्सचाही समावेश आहे. वर्तमान पत्रांच्या काही फोटोग्राफर्सचाही यामध्ये समावेश आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने केलेल्या चाचण्यांमध्ये हे पत्रकार कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले होते.

पत्रकार हे नेहमी समाजाचा प्रतिबिंब असतो. समाजात घडणार्‍या प्रत्येक घडामोडी हा स्वताचा जीव धोक्यात घालून जनतेपर्यंत वर्तमान पत्र आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहचवत असतो. समाजाचा चौथा आधार स्तंभ मजबूत आणि निरोगी राहावा आणि कोरोनामुक्त असावा म्हणून पालिका क्षेत्रातील उपस्थित पत्रकारांची कोरोना चाचणी केली असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply