कर्जत : प्रतिनिधी – येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), ग्रामपातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमास कर्जत व खालापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. राज्य शासनाच्या कृषी विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन राज्य पातळीवर केले होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक कार्यालयाकडून हा कार्यक्रम शेतकर्याच्या बांधावर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्याने वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर 200 मीटर अंतरावरून इलेक्ट्रिक जोडणी घेऊन लॅपटॉप, वायफाय, इन्व्हर्टर आदीची सोय करीत सामूहिकरीत्या शेतकर्यांना सहभागी करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन सहयोगी संशोधन संचालक डॉ. रमेश कुणकेरकर व विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी, नयनिश दळवी व कैलास दळवी यांनी सर्व सुविधा बांधावर उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत सहभाग नोंदविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत या कार्यक्रमात सर्वश्री अण्णा पवार, भरत देशमुख, यशवंत गायकवाड, दत्तात्रय देशमुख, अशोक ताम्हाणे, अनंत बासरे, प्रमोद पिंगळे, रवींद्र देशमुख, प्रवीण देशमुख, विलास पालकर, सुनील भागवत, जगदिश पवार, आप्पा गायकवाड, मच्छिंद्र पारठे यांच्यासह खालापूर तालुक्याच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष गजानन दळवी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ. मर्दाने यांनी मानले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …