Breaking News

नागोठण्यात महाडची पुनरावृत्ती टाळावी; ग्रामपंचायतीला विनंती

नागोठणे : प्रतिनिधी

नागोठणे येथे आठ-दहा वर्षांपासून चालू असलेल्या एका इमारतीचे काम पूर्णच झाले नसले तरी संंधित इमारतीच्या भिंती ढासळायला सुरुवात झाली आहे. तशी तक्रार इमारतीचे शेजारच्या घरात राहणार्‍या रऊफ चिपळूणकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. महाडच्या इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे होण्याची शक्यता नाकारता येत नसून संंधित बिल्डरला तशी समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शहराच्या मोहल्ला भागात रऊफ ाबासाहे चिपळूणकर यांचे वडिलोपार्जित घर असून, त्यांच्या शेजारी भरत डोंगरे नामक ल्डिरने जागा घेऊन आठ ते दहा वर्षांपासून इमारत उभारण्याचे काम चालू केले, मात्र ल्डिरला काम पूर्ण करण्यात अद्यापही यश आलेले नाही. इमारतीच्या उत्तरेकडील एक ब्लॉक पूर्ण झाला असल्याने त्या ठिकाणी एक कुटुंब राहात आहे. संपूर्ण इमारतीला साधारणतः 30 ते 35 ब्लॉक असल्याचे दिसून येत आहे. भिंती ांधून झाल्या असल्या तरी इतर कोणत्याही प्रकारची कामेच झाली नसल्याने दरवर्षी पडणार्‍या मुसळधार पावसामुळे इमारतीच्या पिलर तसेच भिंतींना तडे पडून भिंती पडण्याच्या पवित्र्यात आहेत, असे चिपळूणकर यांचे म्हणणे आहे. इमारतीच्या दक्षिण बाजूलाच हा प्रकार झाला असून त्याचे शेजारी लागूनच आमचे कौलारू घर आहे व कुटुंयिांसह तेथे राहात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सन 2015पासून ग्रामपंचायतीचे आतापर्यंत अनेकदा लक्ष वेधले असले तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे चिपळूणकर यांचे म्हणणे आहे. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात शेवटची लेखी तक्रार दाखल केल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना याबाबत विचारले असता, संंधित तक्रारीचे पत्र माझेपर्यंत अद्याप पोहोचले नसले तरी, माहिती घेऊन संंधित ल्डिरला तशी नोटीस बजावली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयात ल्डिर भरत डोंगरे यांचा संपर्क क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला असता, तो तेथे उपलब्ध नव्हता. त्यामुळे संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घेता आली नाही.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply