Breaking News

खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरूच; वाढीव देयकांची होणार चौकशी

पनवेल : बातमीदार

नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका या वाढीव देयकांची चौकशी करून रुग्णांना वाढीव पैसे परत देणार आहे.

नवी मुंबईत पंधरा ते वीस छोटी-मोठी रुग्णालये आहेत. कोरोना रुग्णांवर ठोस अशी उपचारपद्धत नाही तरीही प्राणवायू पातळी कमी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याचे दिसून येते. बहुतांशी रुग्णांचे मेडिक्लेम असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे रुग्णाला दाखल करतानाच खासगी रुग्णालये 20 हजारांपासून दोन लाखपर्यंत अनामत रकमेची मागणी करीत आहेत. या उपचारांदरम्यान एकतर रुग्ण बरा होऊन घरी जात आहे किंवा त्याचा मृत्यू होत आहे. या दोन्ही परिस्थितीत खासगी रुग्णालये भरमसाट देयके आकारात आहेत. हा आकडा 18 लाखापर्यंत पोहचला आहे.

देयके कमी न झाल्यास पालिका अधिकार्‍यांना रुग्णालयांचे तारणहार हा पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मागील सात दिवसात जादा बिलाच्या तक्रारींची पालिकेने चौकशी करून 32 लाख रुपये कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकांना देण्यास भाग पाडले. अजूनही रुग्णांची लूट सुरू असल्याचे सांगितले.

दक्षता पथक नेमण्याची मागणी काही खासगी रुग्णालयांनी नवीन शक्कल लढवली असून रुग्णाला दाखल करून घेतानाच नातेवाइकांकडून लिहून घेतले जात आहे. यात रुग्णालयाविषयी कुठेही तक्रार करणार नसल्याचे लेखी घेतले जात आहे. त्यामुळे पालिकेने या खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply