पनवेल : वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्र दौर्यादरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष बैठक प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आयोजित केली होती. या दौर्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष
उपस्थिती लाभली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग भाजयुमोची आगामी वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली. सेवा सप्ताह कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर नियोजन करण्यात आले. या बैठकीला भाजप पुणे शहर जिल्हा सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, राजेंद्र साबळे, सुदर्शन पाटसकर, सचिव प्रवीण पोंडे, प्रदीप गावडे, युवती विभाग सहसंयोजिका वैशाली खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.