Breaking News

रखरखत्या उन्हात हनुमान मंदिराला फुटला पाझर

उरण पंचायत समिती परिसरातील चमत्कार

उरण : रामप्रहर वृत्त : उन्हाचा पारा चढत असताना उरण पंचायत समितीच्या आवारात असणार्‍या हनुमान मंदिराच्या छतातून चक्क पाणी पाझरू लागले आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. गेली तीन महिन्यांपासून पाणी पाझरत असल्याची माहिती मंदिराचे पुजारी भरत रावल यांनी दिली. उरण पंचायत समितीच्या परिसरात ठाकूर कुटुंबीयांचे खासगी हनुमान मंदिर आहे. दोन वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीटमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे, मात्र काही दिवसांपासून मंदिराच्या छतातून अचानक पाणी पाझरू लागले आहे. मंदिरातील पुजार्‍याच्या लक्षात हा चमत्कारी प्रकार आला, मात्र हे थंडीमुळे निर्माण झालेले दवाचे पाणी असेल असे समजून त्यांनी प्रथम त्याकडे दुर्लक्ष केले, पण जसा उन्हाचा पारा वाढला तसे हे पाणी जास्त पाझरू लागले. पुजार्‍याने हा प्रकार ठाकूर कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर ही बातमी उरण शहरात वार्‍यासारखी पसरली असून हे पाझरणारे मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे, परंतु नक्की कशामुळे पाणी पाझरते हा संशोधनाचा विषय बनला आहे.

Check Also

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या …

Leave a Reply