Breaking News

गोरगरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मसिहा : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मसिहा असून, त्यांनी देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे शुक्रवारी (दि. 18) व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी फडणवीस बोलत होते.
या उपक्रमास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, महामंत्री श्रीकांत भारतीय आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी फडणवीस आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यू ट्यूब आणि फेसबुकवरून व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रसारण करण्यात आले होते. त्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.

Check Also

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष …

Leave a Reply