Breaking News

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप आणि वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांच्या आदेशानुसार भाजप सेवा सप्ताहाचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात फळवाटप, वृक्षरोपण, रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भाजप अल्पसंख्याक मोर्चा रायगड पनवेलच्या वतीने तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृह येथे वृद्धांना फळवाटप तसेच वृक्षारोपण करून भाजप सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये 15 ते 25 सप्टेंबरपर्यंत सेवा सप्ताह राबविण्याच्या सूचना अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी दिल्या. या वेळी त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण, रुग्णालये, आश्रमशाळा, वृद्धाश्रम आदी ठिकाणी फळवाटप, कोरोना योद्धा सत्कार, रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रमांची रूपरेषा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ठरवून देण्यात आली. त्यानुसार पनवेल रायगडमध्ये हा सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.

या वेळी तालुक्यातील नेरे येथे असणार्‍या वृद्धांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना मायेचा आधार देण्याचा प्रयत्न अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर यांनी केला. त्यांनी फळवाटप केल्यानंतर याच वृद्धाश्रमाच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट केले. वृद्धाश्रमातील कार्यक्रम आटोपल्यानंतर टेंभोडे गाव वाघरेची वाडी येथील आदिवासी वाडीवर जाऊन त्यांनी आदिवासी कुटुंबांनाही फळवाटप करून सेवा सप्ताह साजरा केला.

या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे साबीर शेख, ज्येष्ठ समाजसेवक महेंद्र अण्णा पंडित, इम्रान शेख, लाबुद्दीन, राहुल बोर्डे, रवी रत्नपारखी, बंटी रसाळ, सचिन गुप्ता, स्वराज देसाई, विजय पगारे, रुपेश बोर्डे, राहुल शिंदे, मतीन मौलवी, शिरीष गाडेगावकर, रोहित पायगुडे, पप्पू म्हात्रे, मंगेश दाभाडे, राज भोईर, परेश भोईर, राहुल गायकवाड़, कुवर पाटील, रतन जोशी, कुणाल भोईर, रोशन गडगे, वैभव पाटील, विक्रम फुलोरे, रतन कड़ू, रोशन कडू आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply