Breaking News

भाजपच्या विजयाबद्दल पनवेलमध्ये जल्लोष

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी (दि.3) निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल पनवेलमधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात नाचून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय मिळवित काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला धोबीपछाड दिला. विजयानंतर पनवेल येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या वेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, महिला मोर्चा शहराध्यक्ष व माजी नगरसेविका राजश्री वावेकर, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक देवांशू प्रभाळे, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, के. सी. पाटील, रूपेश नागवेकर महेश सरदेसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply