Breaking News

रिक्षाचालकांना अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना पनवेल शहरच्या वतीने येथील रिक्षाचालकांना शनिवारी (दि. 19) भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य आणि सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप करण्यात आले. राज्यभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांचेही नुकसान झाले असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना पनवेल शहरच्या वतीने रिक्षाचालकांना अन्नधान्य तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता सुरक्षित पडदा अंतर किटचे वाटप भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व संघटनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक मुकीद काझी, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, निलेश बावीस्कर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, उद्योजक इक्बाल काझी, सरचिटणीस अमरीश मोकल, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष इम्तियाज बेग, उपाध्यक्ष एजाज अंबेलकर, नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निर्गुण कवळे, जिल्हा चिटणीस साईचरण म्हात्रे, उबेद पवार, उपचिटणीस शावेझ रिझवी, शहर अध्यक्ष इस्माईल मुल्ला, सरचिटणीस निसार सय्यद, युवा नेते जवाद काझी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षाचालक उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply