Breaking News

ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टची सामाजिक बांधिलकी

पनवेल महापालिकेला 51 हजारांचा धनादेश

पनवेल : वार्ताहर

पनवेलकरांचे आराध्य दैवत असलेल्या कापड बाजारातील पुरातन ज्येष्ठराज सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने कोरोना विरोधात लढणार्‍या पनवेल महापालिका प्रशासनाकडे  51 हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरास पनवेलकरांनी भरभरुन दान दिले आहे. त्याअनुषंगाने पनवेल महापालिकेलाच संकटकाळी हे दान देण्यात आले. या पूर्वीही देवस्थानने पूर परिस्थिती, दुष्काळ यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस मदत दिली. तथा पनवेलमधील गुणे हॉस्पिटल येथे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांवर उपचार होत आहेत. शुक्रवारी (दि. 17)हा धनादेश आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे ज्येष्ठ विश्वस्त मुरलीधर जोशी यांनी सुपूर्द केला. या वेळी विश्वस्त विजय जोशी, प्रथमेश सोमण, शरद जोशी, आनंद काळे, राजेंद्र कोशे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply