Breaking News

जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलमध्ये वाढ

वाढते औद्योगिक करणं यामुळे अंतर्गत दळण वळणाच्याच्या साधनांना खूप महत्व प्राप्त झाले. आहे. देशाची व राज्याची प्रगती ही त्या रस्त्यावर अवबलून असते परंतु सद्या जल मार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर  शासन अधिक भर देत आहे. सद्या महागाई प्रचंड वाढ झाल्याने  सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे.  एका पुला साठी त्याच्या अंतरानुसार किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येत असतो.अश्यावेळी असा खर्च करणे सर्वच ठिकाणी कठीण बाब आहे.अश्यावेळी    दोन तालुके अथवा जिल्हे जोडण्यासाठी जंगल जेट्टी हा उत्तम पर्याय बनला आहे. यामधून ट्रक एसटी लहान चार चाकी वाहने  व लोकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक अगदी सुलभपणे करता येते.  या जंगल जेट्टी मूळे मुरुड तालुक्यातील आगरदांड तर श्रीवेधन तालुक्यातील दिघी ही गावे जोडली गेली तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बाणकोट खाडी ते रत्नागिरी  जिल्यातील वेळास ही गावे जोडली गेल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले गेले आहेत.त्यामुळे जंगल जेट्टी वरदानी ठरत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथून जंगल जेट्टी मुळे लोकांच्या चार चाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांची अगदी सहज वाहतूक होऊन लोकांना सहज प्रवास करणे सोपे जात आहे. पुणे येथून येणारा पर्यटक हा दिव्यागर व श्रीवर्धन येथे वस्ती करून तो मुरुड येथे सुद्धा येऊन आता वस्ती करू लागला आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात जंगल जेट्टीचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी पुणे व कोल्हापूर येथील पर्यटकांना या भागात येणे सोपे झाले असून    पर्यटकांची संख्या मुरुड येथे वाढत आहे.पूल झाला नसला तरी   जंगल जेट्टी मुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास महत्वपूर्ण योगदान लाभले आहे.

सागरी किनार्‍यावर  वसलेली गावे परंतु खाडीचा परिसर असल्याने दळण वळणाच्या साधनात येणारी व्यत्यय पार करत जंगल जेट्टीद्वारे विकास करण्यास मदत होत आहे.रस्त्यानी रत्नागिरी हे नंतर खूप मोठे आहे.परंतु तेच जंगल जेट्टीचा वापर केल्यास हे अंतर खूप कमी पडून इंधनाची व वेळेची सुद्धा बचत होत आहे.प्रत्येक तालुक्याचे अंतर कमी होऊन  तालुके एकमेकांना जोडले जाऊन वाहतूक अंतर कमी होत आहे.तालुके एकमेकांना जोडल्यामुळे जिल्हे सुद्धा जवळ आले आहेत.जंगल जेट्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या मेरी टाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशी मागे लेवी कराद्वारे भरघोस उत्पन्न सुद्धा मिळत आहे.

पर्यटक व स्थानिक नागरिक याना प्रवासाचे उत्तम साधन मिळून प्रवास हा जवळचा बनला असून बहुसंख्य पर्यटक आता जंगल जेट्टीद्वारे प्रवास करताना दिसत आहेत.

उन्हाळी सुट्टी सुरु झाल्याने कोकणात येणार्‍या पर्यटकांचा ओघ वाढला आहे.रस्ते व रेल्वे वाहतुकीबरोबरच आता जल वाहतुकीचा पर्याय हि पर्यटकांना उपयुक्त ठरला आहे.मुंबई ते मांडवा रो-रो सेवा सुद्धा लवकरच सुरु होणार आहे.या जलवाहतूक सेवेमुळे वाहतुकीसाठी होणार खर्च व वेळ हि बचत होत असते.जलवाहतुकीमुळे निसर्गाचा आनंद सुद्धा लुटण्यास मिळत आहे.मुरुड येथून दिवेआगर जाण्यासाठी रस्त्यानी अडीच ते तासाचा कालावधी लागतो परंतु हेच अंतर जंगल जेट्टीमुळे एकतासातच पोहचता येते.श्रीवर्धन येथून रत्नागिरीतील दापोली हर्णे येथे जाण्यासाठी रस्त्याने मोठे अंतर व किमान दोनशे किलोमीटर अंतर रस्त्याने कापावयास लागते.परंतु जंगल जेट्टीमुळे हेच अंतर तासाभरात पार करता येते.सद्या अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण मधील करंज दरम्यान येथे सुद्धा रो-रो सेवा सुरु करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.त्याच बरोबर अलिबाग तालुक्यातील मांडवा ते मुंबईतील भाऊंचा धक्का दरम्यान रो-रो सेवा सुरु होणे अपेक्षित आहे.यामुळे पर्यटकांना अलिबाग येथून त्यांच्या गाडयांसह मुंबईला जाणे खूप सुलभ पडणार आहे.विशेष म्हणजे हे अंतर केवळ डिड तासात पार करता येणार असल्याने लोकांची वेळ व इंधनाची बचत सुद्धा होणार आहे.

जंगल जेट्टी व रो-रो सेवेमुळे वाहतुकीचे नवीन साधन उपलब्ध होऊन निसर्गाचा आनंद सुद्धा त्यांना घेता येत असल्याने सद्या येथे प्रवास करण्यार्‍यांची संख्या खूप वाढताना दिसत आहे.जलवाहतुकीच्या उत्तम पर्याय सापडल्याने मुंबईसह कोकणातील रत्नागिरी जिल्हा अगदी जवळ आला असून पर्यटक व स्थानिक नागरिक यांची वर्दळ वाढली असून स्थानिकांच्या रोजगारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भावी काळात हा जलमार्ग अत्यन्त विकसित होऊन जल वाहतुकीचा वेग वाढून मोठी शहरे गाठणे मानवाला अगदी सहज व सोपे होणार आहे.

-संजय करडे

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply