Breaking News

उरणमध्ये नेत्रतपासणी व चष्मेवाटप

उरण : वार्ताहर

देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने रविवारी (दि. 20) शहरातील महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळेत मोफत नेत्रतपासणी आणि चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, उपाध्यक्ष निर्मला घरत, शहर अध्यक्ष संपूर्णा थळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका यास्मिन गॅस, आशा शेलार, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, रजनी कोळी, दमयंती म्हात्रे, फुंडे गाव बूथ अध्यक्ष राकेश घरत, संतोष ओटावकर, रोहित पाटील, हितेश शाह, प्रकाश कांबळे, अजित पाटील, सुरज ठवले, देवेंद्र घरत, रोहन भोईर, निशा म्हात्रे आदी उपस्थित होते.  या वेळी 459 नागरिकांचे डोळे तपासून चष्मेवाटप करण्यात आले. त्रिलोचन आय केअरचे सुमेध पाटील तसेच प्रेरणा पाटील, समर शेख यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply