नवी मुंबई : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त, भाजप कामगार आघाडीच्या वतीने नवी मुंबई मधील दोन पोलीस ठाण्यात कोरोना साहित्य यात मास्क व सॅनिटायझरचेे वाटप करण्यात आले.
कामगार आघाडीचे प्रदेशअध्यक्ष गणेश ताठे आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष, कामगार आघाडी सेवा सप्ताह कार्यक्रम अंतर्गत रविवारी (दि. 20) सीबीडी पोलीस ठाणे व एनआरआय पोलीस ठाणे बेलापूर या ठिकाणी पोलीस बांधवांच्या साठी कोरोना सुरक्षामास्क, सॅनिटायझर, आणि सन्मानपत्र देऊन पोलीस बांधवांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव संजय पवार, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सोहन बिस्ट, कार्तिक पिल्ले , सुरेश चौधरी, संग्राम सोडगे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.