Breaking News

नेरळमधील अर्धवट कामांबाबत सीईओ नाराज

कर्जत : बातमीदार – नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत बोलावलेल्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आजची बैठक ही सुरुवात आहे, असे सूचक उत्तर देत नेरळ प्राधिकरण मधील अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नेरळ ममदापूर संकुल विकास प्राधिकरणमध्ये नियोजन बद्ध विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, जनता, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन विकासाची ब्लु प्रिंट तयार करूया, असे आवाहन केले.

नेरळ, ममदापूर, कोल्हारे या तीन ग्रामपंचायती यांचा मिळून नेरळ-ममदापूर संकुल विकास प्राधिकरण बनले आहे. या प्राधिकरण मध्ये अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याविषयी चर्चा करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचा सोमवारी

(दि. 21) अधिकृत दौरा आयोजित करण्यात आला होता. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, कार्यकारी अभियंता वारदसकर, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी सी. एस. राजपूत, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा, ममदापूरचे सरपंच दामा निर्गुडा, यांच्यासह नगररचना सहायक संचालक संजय टोपे, उपअभियंता एस. एन. इंगळे, प्रल्हाद गोपणे, नेरळ विकास प्राधिकरणचे तांत्रिक अधिकारी आर एस देवांग आदी प्रमुख उपस्थित होते.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply