Breaking News

टाइम मॅगझिनकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान

100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
प्रसिद्ध टाइम मॅगझिनने 2020मधील जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रांतील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येते. यंदा अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव असे भारतीय नेते आहेत ज्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बिडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या नेत्यांचा टाइम मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश आहे.
या यादीत भारतीय वंशाचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्यमान खुराना, एचआयव्हीवर संशोधन करणारे डॉ. रवींद्र गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांनाही स्थान मिळाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply