Breaking News

फुटबॉलचा बादशाह रोनाल्डोचा आणखी एक विश्वविक्रम

अल्माँसिल, पोर्तुगाल : वृत्तसंस्था

पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचे समीकरण गेल्या काही दिवसांत जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्‍या इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई याच्याशी बरोबरी साधली होती. अली डेईने आंतराष्ट्रीय सामन्यात 109 गोल झळकावले आहेत, मात्र हा विक्रम आता ख्रिस्तियानो रोनाल्डोनो मोडीत काढला आहे. फुलबॉल विश्वचषकातील ग्रुप ‘ए’मधील पात्रता फेरीत पोर्तुगालने आयर्लंडला 2-1ने पराभूत केले. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल झळकावले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचे 111 गोल झाले आहे. सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे.

आयर्लंडने पहिल्या सत्रात पोर्तुगालवर एक गोलने आघाडी घेतली होती. त्यामुळे पोर्तुगालवर दडपण होते, मात्र दुसर्‍या सत्रात पोर्तुगालने आक्रमक खेळी केली. शेवटच्या काही मिनिटांपर्यंत बरोबरी साधण्यात त्यांना अपयश आले. सामन्याच्या 89व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोनो गोल झळकावत बरोबरी साधून दिली, तसेच अली डेईचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दुसरा गोल झळकावत विजय मिळवून दिला. या दोन गोलसह ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय सामन्याची गोल संख्या ही 111 इतकी झाली आहे.

इराणच्या अली डेईच्या नावावर 149 सामन्यात 109 गोल आहेत. पोर्तुगालच्या ख्रिस्तियाने रोनाल्डोच्या नावावर 180 सामन्यात 111 गोल आहेत. मलेशियाच्या मोख्तार दहारीच्या नावावर 89 गोल, हंगेरीच्या फेरेन पुस्कसच्या नावावर 84 गोल आणि जाम्बियाच्या गॉडफ्रे चितालूच्या नावावर 79 गोलची नोंद आहे. सध्या या पाच खेळाडूंमध्ये रोनाल्डो हाच आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. त्यामुळे त्याचा हा विक्रम मोडणं येत्या काळात कठीण आहे.

यापूर्वी रोनाल्डोने सलग 5 यूरो चषकात गोल करण्याची किमया साधली आहे. त्याने 2004, 2008, 2012 आणि 2016 या यूरो स्पर्धेत गोल झळकावले आहेत. रोनाल्डो पोर्तुगालकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. यूरो चषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू मायकल प्लातिनीचा विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. 5 यूरो कप स्पर्धेत रोनाल्डोने एकूण 14 गोल झळकावले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply