Breaking News

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्वच्छता अभियान

कर्जत ः बातमीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरातील भाजपच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशासह राज्यभर सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. कर्जत शहरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझा परिसर, स्वच्छ परिसर या संकल्पनेतून परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कर्जत शहर भाजप महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी महिलांना सोबत घेऊन उस्फूर्तपणे हे अभियान राबविले. या वेळी हातात झाडू घेऊन आपल्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत अभियानाचा नारा सर्वांपर्यंत पोहचला पाहिजे, असे मत अभियानानंतर विठ्ठलनगर भागातील रहिवासी पांडुरंग गरवारे यांनी व्यक्त केले. या वेळी शोभा मित्रगोत्री, अलका जोशी, शारदा भंगाळे, सोनिया गरवारे, ऋतुजा प्रभुणे, पांडुरंग गरवारे, श्रीकृष्ण जोशी, श्रीखंडे काका, भूषण शिवडेकर, विलास चंदन तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, कर्जत नगर परिषदमधील बळवंत घुमरे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, शर्वरी कांबळे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, भाजप युवती मोर्चाच्या सुषमा ढाकणे, मनीषा अथणीकर आदींनी स्वच्छता अभियान राबविले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply