नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि. 28)पासून सुरुवात झाली. राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झाला, परंतु तो नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील घटक कार्यरत नसतील तर परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली जाते. सर्वसाधारणपणे पावसाच्या परतीचा प्रवासाची सुरुवात ही 17 सप्टेंबरला होते. त्यानंतर महिनाभरात संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पाऊस सरतो.
भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवड्यात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थान, पंजाबच्या आणखी काही भागांतून तसेच दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांतून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असेल.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …