Breaking News

भाजपतर्फे आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
सेवा सप्ताहानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघांतील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.  देशाचे कार्यतत्पर व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपच्या वतीने देशभरात सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. याचाच एक भाग असलेल्या आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘आत्मनिर्भर भारत : माझी संकल्पना’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय सण’ असे विषय होते. पनवेल, उरण व कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांसाठी मर्यादित व निशुल्क प्रवेश असलेली ही स्पर्धा आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी या गटासाठी होती.
या स्पर्धेच्या निकालाची घोषणा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात करण्यात आली. या वेळी स्पर्धेचे परीक्षक रवींद्र कुलकर्णी व उमेश घळसाशी यांनी निकाल जाहीर केला.
स्पर्धेत वैदेही सुनील पवार हिने प्रथम पारितोषिक (पाच हजार रुपये), आंचल गुप्ता आणि अर्पिता अरुण पाटील यांनी द्वितीय क्रमांक (तीन हजार रुपये), श्रुती शशिकांत चावरे हिने तृतीय (दोन हजार रुपये), तर उतेजनार्थ (प्रत्येकी पाचशे रुपये) पारितोषिक सिद्धी अनिल बेडेकर, अमित अतुल जोशी, श्रावणी मिलिंद गुजराथी, सृष्टी विक्रांत शिंदे व मोक्षदा दिनेश शेठ यांनी पटकाविले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रकोष्ठ जिल्हा संयोजक राहुल वैद्य, संध्या शारबिद्रे आदींनी मेहनत घेतली.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply