मुंबई ः प्रतिनिधी
पश्चिम उपनगरात मुंबई मेट्रोच्या चाचणी (ट्रायल रन) कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 31) भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारच्या काळात प्रगतिपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्पाची किंमत वाढवून आता श्रेयासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी केल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर फलक दाखवून जोरदार घोषणाबाजीही केली. या वेळी पोलिसांनी भातखळकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …