Breaking News

ठाकूरवाडी-पिरवाडीत मेडिकल कॅम्प

उरण : प्रतिनिधी

मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेल्या ठाकूरवाडी-पिरवाडी येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, अ‍ॅनर्जी पावडर आदींचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, माजी अध्यक्ष डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. घनःश्याम पाटील, डॉ. अजय कोळी, डॉ. प्रशांत बोन्द्रे, डॉ. अजय लहासे, कोविड झोनल ऑफिसर संतोष पवार, प्राध्यापक राजेंद्र मढवी, ठाकूरवाडीचे सरपंच हरेश ठाकूर आदी उपस्थित होते. या वेळी 250हून अधिक व्यक्तींना मास्क तसेच इतर महत्त्वाचे मेडिकल साहित्य वाटण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने तसेच सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगत असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे यांनी उपस्थितांचे व या उपक्रमास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणार्‍या सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply