Breaking News

भाजयुमोतर्फे नवी मुंबईत विविध उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनील कृष्णा सुतार यांच्यावतीने  नेरुळ सेक्टर, 4 येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 नवी मुंबई शहराला स्वच्छतेचा देशपातळीवर पुरस्कार मिळवून देणार्‍या पालिकेच्या सफाई करणारे कामगारांचा त्याचप्रमाणे पालिकेचा अधिकार्‍यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे या कर्मचार्‍यांना कोरोनाच्या कालावधीत मदत म्हणून धान्यवाटप करण्यात आले. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने  या कर्मचार्‍यांना मास शिल्ड आणि मास्क वाटप करण्यात आले.

 नवी मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यामध्ये पालिका कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा गांधी जयंतीच्या निमित्ताने सत्कार करून खरा योद्ध्यांना बळ देण्याचे काम भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील सुतार यांनी सांगितले.

या वेळी समाजसेवक संदीप अग्रवाल, समाजसेवक सरवण पाटणकर, पालिका अधिकारी राजेंद्र इंगळे, तांडेल, म्हात्रे आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply