Breaking News

खोपोलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात वाचनालय; सहजसेवा फाउंडेशनचा उपक्रम

खालापूर : प्रतिनिधी

सहजसेवा फाउंडेशनने खोपोली नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालय सुरू केले असून, त्याचा शुभारंभ फाउंडेशनचे मार्गदर्शक अनिल देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 11) करण्यात आला. खालापूर येथील कारागृहात वाचनालय सुरू केल्यानंतर सहजसेवा फाउंडेशनने सामाजिक जाणिवेतून खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वाचनालयात सुरू केले आहे. त्याचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. सुरुवातीला खोपोली पोलीस ठाण्याचे  निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर देशमुख यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा सुमन औसरमल, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव, दौंड येथील पोलीस पाटील मोतीलाल पाटील, मोहन केदार, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती वर्‍हाडी, खोपोली नगर परिषदेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता वानखेडे यांच्यासह कर्मचारी संदेश चौधरी, अनिल सानप व संभाजी पाटील या वेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र फक्के यांनी केले. सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, तसेच जयश्री कुळकर्णी, बी.निरंजन, प्रथमेश पाटील, सूरज पाटील, बंटी कांबळे, आफताब सय्यद, योगिता जांभळे, अखिलेश पाटील, प्रसन्न भंडारी, आयुब खान, आसमा पटेल, आसिफ खान, सुरेश खोपडे, जयश्री भागेलकर, निलम पाटील, वनिता शहा, मनोज जांगिड यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply