सात जणांचा मृत्यू; 224 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 4) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 224 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 173 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 180 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 26 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 44 रुग्ण बरे झाले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल मोराज रिव्हरसाईड, कामोठ येथे सेक्टर 6 श्रीजी अपार्टमेन्ट व सेक्टर 25 सिव्हल पेंट बिल्डिंग, खारघर येथे सेक्टर 13 टुलीप प्लाझा व सेक्टर 13 गोविंद भगत चाळ येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत नऊ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3175 झाली आहे. कामोठेमध्ये 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4464 झाली आहे. खारघरमध्ये 63 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4465 झाली आहे.नवीन पनवेलमध्ये 32 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3753 झाली आहे. पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3494 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 795 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 20,146 रुग्ण झाले असून 17,792 रुग्ण बरे झाले आहेत. 1902 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.32 टक्के आहे. आतापर्यंत 452 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात आढळले सात नवे रुग्ण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे सात रुग्ण आढळले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये जेएनपीटी टाऊनशिप, कोटनाका बालाजी रोड, खोपटे पाटील पाडा, आएच उरण, विंधणे, मांडळ आळी पिरकोन, बौद्धवाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1909 झाली आहे. त्यातील 1644 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
महाडमध्ये सात जणांना लागण
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे नव्याने सात रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णंमध्ये कांबळे तर्फे बिरवाडी दोन, धामने, नांगलवाडी, फौजी आंबावडे, चवदारतळे, विरेश्वर मंदिर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर नांगलवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाडमध्ये 72 रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून, 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1530 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर 1672 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जतमध्ये 10 कोरोना पॉझिटिव्ह, तीन रुग्णांचा मृत्यू
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसात तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. कर्जत तालुक्यात रविवारी एका डॉक्टरसह नवीन 10 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 1667 रुग्ण आढळले असून 1488 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. तर 96 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 83 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये म्हाडा वसाहतीत चार, नेरळ दोन, मुद्रे बुद्रुक विभाग, मांडवणे, तांबस, नेरळ नजीकच्या ममदापूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.