पनवेल ः रायगड जिल्ह्यात 308 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 4) झाली, तर दिवसभरात 369 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 173 व ग्रामीण 26) तालुक्यातील 199, अलिबाग 22, माणगाव 16, खालापूर 12, कर्जत व मुरूड प्रत्येकी 10, पेण आठ, उरण व महाड प्रत्येकी सात, रोहा सहा, तळा चार, श्रीवर्धन तीन, सुधागड दोन, आणि म्हसळा व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा पाच, ग्रामीण दोन) तालुक्यात सात, कर्जत तीन, माणगाव दोन आणि खालापूर, पेण व महाड तालुक्यात एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 48,346 आणि मृतांची संख्या 1343 झाली आहे. जिल्ह्यात 43,060 जण कोरोनामुक्त झाल्याने 3935 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper